मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोटाची धमकी! आरोपीस उत्तर प्रदेश येथून अटक

0

मुंबई :
मुंबई शहर पोलिसांना 24 जूनच्या सायंकाळी मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या भामट्याला उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून उचलले आहे. दरवेश राजभर असे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या भामट्याचे नाव आहे. दर्वेश शारदा राजभर उर्फ राहुल (२२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्याऱ्या दरवेश राजभरने आपल्याला स्फोट घडवून आणण्यासाठी दोन कोटी मिळाल्याची मेसेजमध्ये नोंद केली होती. इतकेच नाही, तर तुम्ही जर दोन लाख रुपये दिले, तर हे बॉम्बस्फोट टाळता येतील आणि मी माझ्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असेही नमूद केले होते. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र हा फेक कॉल असू शकतो अशी धारणाही मुंबई पोलिसांची झाली होती. तरीही पोलीस कोणताही धोका पत्करायला तयार होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास करत दरवेश राजभरच्या जौनपूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० ते १०.२० वा. च्या दरम्यान एका मोबाईलवरून मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी व पुणे येथे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याच्या धमकीचा एक फोन संदेश आला. ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या मोबाईल क्रमांक विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तसेच दोन्ही शहरातील पोलिसांनी अलर्टही जारी केला आहे. ही धमकी देणाऱ्या आरोपीचा तपास ओशिवरा पोलिसांनी सुरू केल्यानंतर तो उत्तर प्रदेश जौनपुर येथे असल्याचे समजले. त्यानंतर सपोनि संदीप पाटील, सुनिल खैरे व पोह रघुनाथ बरगे असे पोलीस पथक रवाना करून आरोपीला जौनपुर, उत्तर प्रदेश येथून अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)