कोरोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये

0


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून कोरोना लसीची विचारणा करण्यात येत असल्यामुळे राज्याने गरजेनुसार कोरोना लसीची मागणी नोंदवली आहे, मात्र केंद्राकडून कोरोना लस उपलब्ध करण्यात आली नसल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशाची वाट न पाहता राज्य सरकार उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करणार आहे, अशीही माहीत सूत्रांनी दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने कोरोना लस बनवणाऱ्या उत्पादकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सध्या बूस्टर डोसची उपलब्धता किती आहे, या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडे विचारणा केली जात आहे. सध्या पालिका रुग्णालयांमध्ये कोरोना लसीची उपलब्धता नाही आणि खासगी रुग्णालयांना कोरोना लसीची साठवणूक करण्यासह त्याचे व्यवस्थापन करणे खर्चिक होत असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीची उपलब्धता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकाही ठिकाणी कोरना लसीची उपलब्ध नाही. राज्यातील गरजेनुसार कोरोना लसीची मागणी केंद्र सरकारकडे नोंदवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. पण जोपर्यंत केंद्र सरकारकडून नोंदवण्यात आलेल्या लसीची उपलब्धता होत नाही तोपर्यंत उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करण्याचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय राज्य सरकारकडून पालिकेने बंद केलेली काही लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोनाचे ६६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ५५ हजार १८९ झाली आहे. तर राज्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४७७ झाली आहे. तर राज्यात ५३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख ६६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार ४७ सक्रिय रुग्ण आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)