मुंबईतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री अटक

0


मुंबई : मुंबईतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका भोजपुरी अभिनेत्रीला मुबंई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.तसेच या काळ्या धंद्यात जबरदस्तीने ढकललेल्या तीन मॉडेल्सची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. काही दिवसापुर्वी मुंबईत ऐका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा (High profile sex racket) पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तल मुंबईत अटक करण्यात आली होती. पुन्हा अशीच एक घटना मुंबईत घडली आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली. आरोपी महिलेने आरे पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका प्रसिद्ध हॉटेल येथे हा व्यवसाय सुरु केला होता. सुमन कुमारी तेतू गोपी (वय 24 वर्ष) असं या महिलेचं नाव असुन ती भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत असल्याची बाब उघडकीस आली. ही अभिनेत्री अनेक मुलींना बॅालिवूडमध्ये काम मिळवुन देण्याच आणि मॅाडेल होण्याच आमिष देत होती. तिच्या आमिषाला बळी पडुन अनेक मुली यामध्ये अडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी तीन मॉडेल्सची सुटकाही केली.

अनेक भोजपुरी चित्रपटात केलंय काम

आरोपी महिला भोजपुरी फिल्म सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने ‘लैला मजनू’ या भोजपुरी फिल्ममध्ये तसेच ‘जॉमेस्टिक बॉक्स’ या वेब सिरीज आणि ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या भोजपुरी कॉमेडी एपिसोडमध्ये काम केलेले आहे. तसेच तिने भोजपुरी, हिंदी, पंजाबी या विविध भारतीय भाषांमधील अल्बम सॉंगमध्ये लीड रोल केलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)