फेरीवाल्यांना हटवून रिक्षा थांबे? मनसे शहर अध्यक्षांना फेरीवाल्यांचा सवाल

0

डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरु करण्यासाठी सोमवारी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पालिकेचे सहायक आयुक्त यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी केली. प्रवाश्यांना सोयीस्कर रिक्षा थांबा यावर चर्चा झाली. या निर्णयावर संतापलेल्या फेरीवाल्यांनी वाहतूक शाखेबाहेर मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना थांबवून जाब विचारला. फेरीवाल्यांना हटवून रिक्षा थांबे करून आमच्यात भांडण लावण्याचे काम करत आहात का? असा प्रश्न घरत यांना विचारला.

 सदर पाहणी बाबत फेरीवाल्यांना समजले असता फेरीवाले वाहतूक शाखेसमोर आले. मनसे अध्यक्ष घरत बाहेर आल्यानंतर फेरीवाल्यांनी घरत यांना घेराव घालत जाब विचारला. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना मनाई केली आता रिक्षा थांबे करत आहात. मनसे फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यात भांडण लावत आहात का ? असा जाब विचारला. यावर मनसे शहरअध्यक्ष घरत यांनी तीन दिवसात फेरीवाल्यांसाठी बैठक होणार असून नोंदणी फेरीवाल्यांना जागा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले.

पालिकेच्या मुख्यालयात मनसे आमदार पाटील, पालिका आयुक्त आणी फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणा अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. सोमवारी मनसे शहरअध्यक्ष घरत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे पदधिकारी काळू कोमास्कर, प्रमोद गुरव, फ प्रभाग शेताचे सहायक आयुक्त भरत पाटील, ग प्रभाग शेताचे सहायक आयुक्त संजय साबळे, डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी स्टेशन परिसरात मीटर रिक्षा थांबासाठी पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)