कोरोनाची आकडेवाडी उरात धडकी भरू लागली आहे. मागील आठवड्यापासून राज्यात व विशेष करून मुंबईत कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक कोरोनाआहे. रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णाचा आकडा दररोज हजाराहून अधिक येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी तातडीने टास्क फोर्सच्या सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे तसेच ठाण्यासह १० अतिजोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना सावंत यांनी बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीला पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते.
कोरोनाचे ८५० नवे रुग्ण,४ जणांचा मृत्यू
राज्यात शनिवारी८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ६४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्याचा राज्याचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा ९८.१० टक्के इतका आहे. तर मृत्यूदर हा १.८१ टक्के इतका आहे. आजच्या दिवशी १६,४१२ नमुन्यांची चाचणी झाली. त्यांपैकी १३, ४४५ नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी झाली तर उर्वरित २७९९ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली.