मुंबई : राजकीय वर्तुळात जागा वाटपावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० विधानसभा जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केवळ ५० आमदार आहेत. त्यांना यापेक्षा जास्त जागांची गरज नाही, असे बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप शिंदे युतीत फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार याचा आकडाच सांगितला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खळबळजनक विधान केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शिंदे गटाला 48 जागाच वाट्याला येणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. येत्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. बावनकुळेंच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय. मात्र, भविष्यात कोणता वाद उफाळू नये म्हणून भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासावर केली आहे. अशी कोणतीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरुन भाजप शिंदे युतीत फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशातच, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार याचा आकडाच सांगितला आहे. टी व्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, कोण नेता काय घोषणा करत असेल याला काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेला युतीचा हा विषय आहे. आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहोत. असा आकडा सांगत गायकवाड यांनी बावनकुळेंच्या वक्तव्याला धुडकावून लावले.