घरफोडीचे २५ गुन्हे दाखल असलेले दोन सराईत चोर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

0


डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात २५ घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हे दोन्ही चोरटे मुंब्रा परिसरात राहणारे असून विशेषतः मेडिकलला टार्गेट करत कटरच्या मदतीने शटर तोडून रोख रक्कम सह नशा करण्यासाठी कोरेक्स सिरपची चोरी कारायचे.

तपासा दरम्यान पोलिसांनी या दोघांकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. चौकशी दरम्यान पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांकडून मानपाडा टिळकनगर, विष्णूनगर व नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२ चोऱ्या उघडकीस आणल्या असून त्यांच्याकडून ३५ तोळे सोन्याचे व ६२ तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २१ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

उसरघर परिसरात मानपाडा पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना हे दोन्ही चोरटे दुचाकीने येत होते. पोलिसांना पाहून दोघांनी गाडी तिथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोन्ही चोरटे एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ओळखले व तत्काळ पाठलाग करत पकडले. सरूद्दीन शेख व मोहम्मद शहा अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींवर डोंबिवली पोलीस ठाणे, विष्णु नगर पोलीस ठाणे तसेच ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. तर मुंबई येथील पायदुनी, सायन, ताडदेव, व्ही.पी. रोड, नागपाडा, आगरीपाडा या पोलीस ठाण्यात सुमारे 25 घरफोडी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)