महापे एमआयडीसीतील कंपनीच्या सुरक्षारक्षकांना बांधून लाखाेंची चोरी

0


नवी मुंबई : नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये चाेरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही भागात सुरक्षा रक्षकांना शस्त्रांचा धाक दाखवून कंपन्यांचे साहित्य लुटत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये असलेल्या सुपर स्टीम बॉयलर कंपनीत चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून कोयत्याचा धाक दाखवून चोरी केली. चोरट्यांनी कंपनीच्या मागील कंपाऊंडचा कडी तोडून कंपनीची कॉपर वायंडिंग केबल वायर, पितळी नोझल व इतर वायर असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.


विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना बंदुकीच्या धाकाने चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील चौघे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. दरम्यान, याच कंपनीत पुन्हा चोरीची घटना घडल्याने घडल्याने व्यवस्थापन चक्रावले आहे. या घटनांमुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)