डोंबिवलीतील टँकर माफियांचा पर्दाफाश ; उदय सामंत यांची कामगिरी

0


डोंबिवली : डोंबिवली शहरातील अनेक गावांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा संपूर्ण भाग टँकरवर अवलंबून आहे. पण, या टँकर माफियांचा पर्दाफाश शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. डोंबिवलीत मध्यरात्री अवैध टँकर कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. डोंबिवलीत टँकर माफियांचा धुव्वा उडाला आहे. त्यामुळे खुद्द मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची दखल घेतली. सोमवारी रात्री उशिरा स्वत:, अधिकारी आणि पोलिसांसह कंपनीवर छापा टाकण्यात आला.

कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करून विकले जात होते. डोंबिवलीतील पाणी समस्येला टँकर माफियाच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. एकूण 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. महापालिकेचे पाणी चोरून बेकायदा मिनरल वॉटरचा कारखाना उभारण्यात आला. त्यासोबत हजारो लिटरच्या बेकायदा टाक्या बांधण्यात आल्या. कारखाना सील करून टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टँकर चालकांचे परवाने जागेवरच रद्द करण्यात आले आहेत. याप्रकरणी उदय सामंत यांनी टँकर लॅबचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई आहे. अनेक गावात टँकरने पाणी आणले जात आहे. या भागात कल्याण डोंबिवलीतून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण, टँकर माफिया मोठ्या प्रमाणात टँकरचा पुरवठा करत आहेत. या टँकर माफियांकडे एवढे पाणी नेमके कसे येते, असा प्रश्न उपस्थितांमधून विचारण्यात आला. अखेर कल्याण डोंबिवली महापालिका पाण्याची चोरी करत असल्याचे समोर आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)