मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना भांडुप येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला का? त्यांनी हल्ला का केला? हल्ल्यामागील सूत्रधार कोण? संदीप देशपांडे यांच्याशी त्यांचे पूर्वीचे वैर होते का? दोघेही कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागील नेमके कारण समोर येईल.
काल दादरच्या शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आठ पथके तैनात केली. या प्रकरणी दोन सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम हाती घेतली असून भांडुप येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.