मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर येत्या रविवार 5 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी लाईनवर असणार आहे. हा मेगा ब्लॉक सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे. या मेगा ब्लॉकचा परिणाम लोकल सेवेवर तर होईलच त्यासोबत एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील होणार आहे. या मेगा ब्लॉकच्या काळात अप मेल आणि डाउन मेल / एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन केलं जाणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 12126 क्रमांकाची पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10-15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. विशेष म्हणजे सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
- शॉर्ट टर्मिनेशन मेमू सेवा
- ‘या’ मार्गावरील सेवा रद्द
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.