देशातील 8.87% गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात ; महिला विरोधी गुन्ह्यात राज्य तिसऱ्या क्रमांकावर

0


मुंबई : राज्याच्या गृह विभागाच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारा अहवाल समर्थन अध्ययन केंद्र या संस्थेने जारी केला आहे. देशात गुन्ह्यांच्या नोंदणीत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे नुकत्याच समर्थन केंद्र या संस्थेने जारी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पिय अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे. 2021 मध्ये भारतीय दंड संहिता अंतर्गत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची देशात सर्वाधिक 540800 प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती गृह विभागाच्या अर्थ संकल्पिय अहवालात समोर आली आहे.

महाराष्ट्रात सन 2021 मध्ये 5 लाख 40 हजार 800 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे अहवालात म्हंटले आहे.सन 2021 मध्ये भारतात 60 लाख 96 हजार 310 गुन्हे नोंदवले गेले असून, नोंदविलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये तामिळनाडू 7 लाख 56 हजार 753, 2.गुजरात 7 लाख 31 हजार 738, 3. उत्तर प्रदेश- 6 लाख 8 हजार 82, तर 4. महाराष्ट्र 5. लाख 30 हजार 800 इतके गुन्हे दाखल झाले असून महाराष्ट्र ४ थ्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण घडलेल्या 60 लाख 96 हजार 310 गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण 8.87% आहे.

  • मुंबईत 27% गुन्ह्यात वाढ
अहवालानुसार 2021 मध्ये मुंबई शहरात विविध अशा 63689 गुन्ह्याची नोंद झाली. सर्वात जास्त देशाच्या राजधानीत 2.89 लाख गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या. मुंबईत दररोज सरासरीने किमान 174 विविध प्रकारचे गुन्हेगारी गुन्हे आयपीसी कलमांतर्गत नोंदवले गेले, आकडेवारीनुसार 2019 आणि 2020च्या तुलनेत 2021 मुंबईत गुन्हेगारीत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • महिला विरोधी गुन्ह्यात राज्य तिसऱ्या क्रमांकावर
समर्थन संस्थेच्या अहवालातील आकडेवारीनुसार 2021 या वर्षी देशातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार 2021 या वर्षी महिलांविरुद्ध एकूण 428278 गुन्हे नोंदवले गेले त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 56083 गुन्हे नोंदवले गेले, त्यानंतर राजस्थान 40738 आणि महाराष्ट्र 39526 आहेत. सरासरी पाहता महराष्ट्रात रोज 112 महिला विरोधात अत्याचाराच्या घटनांची नोंद 2021 मध्ये करण्यात आली महानगरांच्या बाबतीत, दिल्ली 3948 नोंदणीकृत गुन्ह्यासह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई 1103 आणि बेंगळुरू 578 आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)