महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई : कोट्यवधी रुपये आणि बेहिशेबी दागिने जप्त

0

मुंबई : मुंबई आणि नागपूरसह 15 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली असून, या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून मोठी मालमत्ता जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मेहदिया, लोकेश आणि कथिक जैन यांनी केलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर ईडीला 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

दरम्यान, या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये डोळे दिपवणारी रोकड, दागिने (jewelry) यांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)