मुंबई : विधानभवनात पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले, दिल्ली सरकारप्रमाणेच तत्कालीन मविआ सरकारनेही विदेशी दारुवरील कर माफ केला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत दिली होती. तसेच, वाईन किराणा दुकानात विकण्यासही परवानगी दिली होती.
त्यामुळे दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत आहेत का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्रात तत्कालीन मविआ सरकारने मद्यविक्रेत्यांवर जी सवलतींची खैरात दिली, त्याची फाईल ओपन होणार आहे का? म्हणूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली का?, असे म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दारुवाल्याचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात आले आहे?, असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे.