संजय राऊतांना सिझोफ्रेनियाची लक्षणं दिसताहेत

0
                            


ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आज श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मी हाडांचा डॉक्टर असलो तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होतोय का? अशी लक्षणं दिसू लागली आहेत. आभासी जग आणि वास्तविक जगात त्यांनी गल्लत केली आहे. एका आभासी जगात ते आज राहत आहेत’, असे म्हणत टोला लगावला.

संजय राऊत यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचा आरोप केला होता. त्यावर श्रीकांत शिंदे बोलत होते. त्यांनी म्हटले की, ‘संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना मानसिक आजार झाला, असे लक्षण दिसत आहे. त्यात रुग्णाला भास होतात. मला कुणीतरी आवाज देतो, असे वाटते. राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. राऊतांमुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होत आहे.


संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद

संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल. आणि त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंधरकर यांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते. मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते, असे चिंधरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)