वरळी पोलिसांच्या लॉकअपमधून आरोपी फरार

0

 


मुंबई : मुंबईतील वरळी पोलीस स्थानकाच्या लॉकअपमधून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला शौचालयासाठी नेण्यात आले होते शौचालयाच्या खिडकीची काच काढून आरोपी फरार झाला. 

तपासादरम्यान आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून सात लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी हा मूळचा गुजरातचा रहिवासी असून त्याच्यावर नाशिकसह गुजरातसह अन्य ठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील जिजामाता नगर येथे नाकाबंदीदरम्यान आरोपीला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याकडून सात लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

मात्र अवघ्या काही तासांतच पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी फरार झाला आहे. या आरोपीच्या शोधासाठी वरळी पोलिसांचे पथक चार दिवसांपासून गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक तपास वरळी पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)