मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीने ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित ‘मराठी साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज दुपारी ३.०० ते ५.०० मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे. . वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे स्मरण यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, उपसभापती नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक लोकाधिकारी समितीच्या महासंघाच्या वतीने हा कार्यक्रम होणार असून उद्धव ठाकरे आणि आदित्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवी मुंबईत मुलाखत होणार आहे. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत होणार आहे. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे.