मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.
विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काल चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे विरोधक यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या मुद्यावर गाजवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
- सुरक्षेची दक्षता
- विधान भवनाला रंगरंगोटी करत, झेंडू आणि विविध फुलांची सजावट करण्यात आलीये
- यंदाचं अधिवेशन विशेष असेल. कारण सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय
- त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.
- शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे
- शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे
- त्यामुळे ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे
- आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री इतर विभागाचे कामकाज पाहतील
- माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास- उदय सामंत
- सार्वजनिक बांधकाम -शंभूराज देसाई
- मृदू व जनसंधारण - दादा भुसे
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य -संजय राठोड
- मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन - तानाजी सावंत
- अल्पसंख्यांक विकास- अब्दुल सत्तार
- पर्यावरण व वातावरणीय बदल- दीपक केसरकर
- माहिती व जनसंपर्क- संदिपान भुमरे
- सामान्य प्रशासन, परिवहन -गुलाबराव पाटील