डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या १४ जून २०२१ रोजी ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला. यंदा राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस असल्याने १०५३ फुलझाडांचे वाटप मनसे डोंबिवली शहरातर्फे करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक फुले घेण्यासाठी आले होते. नेत्याचा हा पर्यावरणपूरक वाढदिवस हा चर्चेचा विषय झाला आहे. (Distribution of flower trees in Dombivali on the occasion of Raj Thackeray's birthday)
गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले,टवटवीत,सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब,मोगरा,जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यांनी यावेळी सांगितले.डोंबिवलीकर नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी केवळ १ तासात तब्बल ११०० रोपांचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, प्रकाश माने, दिपीका पेडणेकर, कोमल पाटील, स्वप्ना पाटील, ज्योती खवसकर,अरुण जांभळे, मिलींद म्हात्रे, दिपक शिंदे, संदिप म्हात्रे, रविंद्र गरुड, सुहास काळे, दिप्तेश नाईक, रमेश यादव, प्रदिप बावसकर, परेश भोईर, प्रेम पाटील, उदय वेळासकर आदी उपस्थित होते.