कोल्हापूरातील गृहरक्षक जवानांनी चक्क मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे मागितली मदत

1

करोना विषाणूच्या उद्रेकाचा नोकरदारांना सर्वांत मोठा फटका बसला असून, काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर काहींना कमी पगारात घर चालविण्याची कसरत करावी लागत आहे.  त्या पार्श्वभूमीवर  पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलात काम करणारे कर्मचारी म्हणजे होमगार्ड जवानांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.  गेलया दिड ते दोन वर्षांपासून नोकरी नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही होमगार्ड सेवेत भरती झालेलया काही जवानांना नोकरीला रुजू करून घेत नसल्याने आणि कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्याने त्यांनी थेट कल्याण डोंबिवली ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांना पात्रातून मदत मागितली आहे.  


हे सर्व होमगार्ड कोल्हापूर जिल्हयातील असून फेब्रुवारी २०१९ ला भरती झाले. त्यांनी आतापर्यंत जोतिबा बंदोबस्त, लोकसभा बंदोबस्त, महापूर बंदोबस्त आणि इतर काही बंदोबस्त केले आहेत. त्याचबरोबर होमगार्डचे ट्रेनिंग अकोला पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे सप्टेंबर २०१९ ला ३५ दिवसांचे लागले होते. ह्या जवानांची १० दिवसांचे बेसिक ट्रेनिंग कोल्हापूर जिल्हा पोलिस मुख्यालय येथे झाली. ट्रेनिंग सेंटर मधून परत आलेपासून ह्या जवानांना कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त लागला नाही. त्याचबरोबर हजर करून घेण्याबाबत वेळोवेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा होमगार्ड संदेशकांना भेटले, परंतू कोणत्याच प्रकारची दाद मिळाली नाही अथवा हजर करून घेतलेले नाही.


गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) हे मानधन तत्त्वावर आवश्यकतेनुसार तैनात केले जातात. निवडणुका, गणेशोत्सव, सण-उत्सव याशिवाय आपत्कालीन स्थितीत पोलिस होमगार्डची मदत घेतात. नाशिक जिल्ह्यात २१० होमगार्ड आहेत. राज्यातील होमगार्डची संख्या किमान ४० हजारांच्या पुढे आहे. करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून हजारो होमगार्डना आता पोलिसांकडून काम मिळणे कमी झाले आहे. बाहेरही उद्योगधंद्यांची स्थिती बिकट असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना पात्र पाठवून मदतीची अपेक्षा दर्शवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा