डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ वाऱ्यामुळे अपघात झाला आहे. रेल्वेच्या सहाव्या लेनमध्ये ओव्हरहेड वायरवर एक झाड कोसळल्याने हा अपघात झाला.
डोंबिवली : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) परिणाम कल्याण डोंबिवलीमध्येही (Dombivli) जाणवत आहेत. दुपारी शहरात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. घरांचे छप्पर उडून गेले आहेत. विजेचे खांब पडले आहेत. तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ (Dombivali Railway Station) वाऱ्यामुळं एक अपघात झाला आहे. रेल्वेच्या सहाव्या लेनमध्ये ओव्हरहेड वायरवर एक झाड कोसळल्याने हा अपघात झाला. ओव्हरहेड वायरवर पडल्यावर जास्त व्होल्टेजमुळे झाडाला आग लागली होती.
या रेल्वे रुळावरून मुंबईकडे लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. त्यामुळे या अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ओव्हरहेड वायरवर पडलेले झाड काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले आहे. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. (tree fall on overhead wire)
डोंबिवली रेल्वे स्टेशन (Dombivali Railway Station) नजीकही वाऱ्यामुळं एक दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या सहाव्या लेनवर असलेल्या ओव्हरहेड वायरवर एक झाड कोसळल्याने दुर्घटना घडली. #CycloneTauktae #Dombivli pic.twitter.com/eOie1SF5LB
— महामुंबई मंथन ©️ (@MumbaiManthan) May 17, 2021
वाचकहो, 'महामुंबई मंथन'ला फेसबुकला फॉलो करताय ना?... अजून लाईक केलं नसेल तर क्लिक करा ( @MahaMumbaiManthan ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!