डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोफत निर्जंतुकीकरण अभियान

2

डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तुकाराम नगर प्रभागातील भगत वाडी, दत्त प्रसाद, सुधा स्मृतीसागर या इमारतींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोफत औषध फवारणी व निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले.  (Free sterilization campaign by Maharashtra Navnirman Vidyarthi Sena in Dombivali)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तुकाराम नगर प्रभागातील भगत वाडी, दत्त प्रसाद, सुधा स्मृतीसागर या इमारतींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोफत औषध फवारणी व निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले.  डोबिवलीत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तुकाराम नगर प्रभागातील भगत वाडी या भागात खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंध व निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री सुहास सुभाष काळे व कु. समीर मोर्ये, कुणाल मोर्ये  यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला असून सामाजिक बांधिलकी जपत पाच दिवस निर्जंतुकीकरण करण्यात आले. या उपक्रमा बद्दल स्थानिक रहिवाशांनी कु. समीर मोर्ये व  कुणाल मोर्ये यांचे विशेष कौतुक केले.


यावेळी श्री. सुहास काळे, श्री. जयदीप मांडोळे, कु. कौस्तुभ मालशे, कु. नैतिक जोशी, कु. निशांत चिटणीस, कु. चिन्मय वारंगे, श्री. मोहन हेबळे, श्री. तुषार अडकर, कु. कुणाल मोर्ये, कु. पारस चिंचणकर हे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

2टिप्पण्या
  1. उत्तम कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक सत्ताधारी व विरोधी पक्षाने राजकारण बाजूला ठेवून अशी कामे केली पाहिजेत.

    उत्तर द्याहटवा
  2. उत्तम कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक सत्ताधारी व विरोधी पक्षाने राजकारण बाजूला ठेवून अशी कामे केली पाहिजेत.

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा