राज्यातील कोरोना रूग्णांचा वाढता आलेख निश्चितच चिंतेचे कारण आहे. त्यामुळे सरकारकडून आणखी काही निर्बंध वाढविण्यात येतील. लोक सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करीत नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे.
मुंबई: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत कडक नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक बनला आहे. लोक अनेक वेळा अपील करून नियमांचे पालन करीत नसल्याने हे नियम आणखी कडक होण्याची शक्यता आहे. सरकारने यावर आधीच संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
कोरोना रूग्णांची संख्या वाढतच राहिल्यास नजीकच्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यापूर्वी सरकारने काही कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. कोरोना रूग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्यात रात्री कर्फ्यू आहे. परंतु, यापुढे नियम अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.
- राज्यात संपूर्ण लॉकडाउन होण्याची शक्यता कमी आहे.
- राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद होण्याची शक्यता कमी आहे.
- प्रवासी, बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू राहणे अपेक्षित आहे.
- थिएटर, मॉल्स पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे.
- विवाह सोहळ्यावरील निर्बंध अधिक कडक केले जातील.
- हॉटेल्सची क्षमता 50 टक्के राहील.
- दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणे अपेक्षित आहे.